राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्र निर्मिती होते. अशा व्यापक दृष्टीने प्रेरित होऊन जळगाव येथील ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात शिक्षण, साहित्य, समाजसेवा, प्रशासन, पत्रकारिता आदी क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्य करुन देशसेवा करणाऱ्या कर्मवीरांना मान्यवरांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. युद्धजन्य परिस्थितीमुळे कार्यक्रमाच्या नियोजनात बदल केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. त्यांनी व्हीडीओद्वारे केलेल्या १५ मिनिटांच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या विचारांतून एकात्मक भारतीय संस्कृती व एकात्मक विश्व संस्कृती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युद्धात शहीद झालेल्या जवानांना तसेच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रशासकीय क्षेत्रात स्वच्छ प्रतिमा म्हणून सुपरिचित असलेले डाएट कॉलेजचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पुरस्कारार्थी मान्यवरांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ‘सलाम’ पुस्तक, पेन, शाल, श्रीफळ, बुके भेट देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींकडून कोणत्याही प्रकारची देणगी न घेता पुरस्कार सोहळ्याचे डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक केले. सूत्रसंचालन कवी अशोक पारधे तर समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी आभार मानले.
यांना देण्यात आले पुरस्कार
पुरस्काराने सन्मानित केलेल्यांमध्ये स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (मरणोत्तर), उद्योजक-समाजसेवक भवरलाल जैन (मरणोत्तर), दलितमित्र द. भि. तायडे (मरणोत्तर), ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. प्र. श्रा. चौधरी (मरणोत्तर), समाजसेवक भिलाभाऊ गोटू सोनवणे (मरणोत्तर) तसेच डॉ. श्रीपाल सबनीस (पुणे), आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव), मिनल करनवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव), डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), ज्ञानेश्वर ढेरे (मनपा आयुक्त, जळगाव), डॉ. शैलजा करोडे (मुंबई), सुभाष कोटेचा (नागपूर), शुभांगी पासेबंद (ठाणे), (गडचिरोली), हनुमंत पडवळ (धाराशिव), उद्धव समिंद्रे (परभणी), प्रा. भारती पाटील (सांगली), दीपिका क्षीरसागर (अमरावती), डॉ. अनंता सूर (यवतमाळ), शंकर मानवतकर (बुलढाणा), डॉ. सुहासकुमार बोबडे (सातारा), डॉ. गणेश जायस्वाल (धुळे), शशांक देशमुख (अमरावती), पत्रकार शरद भालेराव (जामनेर, ह.मु.जळगाव), डी. डी. पाटील (जामनेर), सदानंद भावसार (पारोळा) यासोबत भगवान भटकर, नीळकंठ गायकवाड, भास्करराव चव्हाण, जयसिंग वाघ, एन. एफ. बडगुजर, सतीश जैन, चंद्रकांत भंडारी, चुडाराम बल्हारपुरे, डी. बी. महाजन, रवींद्र मोराणकर, गोविंद देवरे, समाधान बडगुजर, माया धुप्पड, प्रिया सफळे, डॉ. सुभाष महाले, कवी अरुण म्हात्रे, एस.डी. भिरुड, प्रा. बी. एन. चौधरी, युवराज माळी, राजेंद्र सपकाळे, संगीता पवार, मंगला रोकडे, जितेंद्र गवळी, दीपक तांबोळी, इंजि. प्रकाश पाटील, फिरोज शेख, डॉ. मिलिंद बागुल, आर. जे. सुरवाडे, अशोक पारधे, प्रा.प्रकाश महाजन, विजय लुल्हे, ॲड. गणेश सोनवणे, अजय भामरे, विशाखा देशमुख, गोविंद पाटील, स्वाती सूर्यवंशी, प्रभावती पाटील, सुरेखा क्षीरसागर, संध्या महाजन, संतोष मराठे, वर्षा अहिरराव, निवृत्तीनाथ कोळी, मोहिनीराज जोशी, किशोर पाटील, कवी प्रकाश पाटील, किशोर नेवे, प्राचार्य नारायण पवार, प्राचार्य डॉ.शशिकला सोनवणे (सर्व पुरस्कारार्थी जळगाव) अशा पुरस्कारार्थी कर्मवीरांचा समावेश होता.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरण
यावेळी क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसाचे वितरण करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम ईश्वरी देशमुख (सातारा), द्वितीय मयुरी कोळी (जळगाव), तृतीय अनुराग आवेकर (पुणे), उत्तेजनार्थ राहुल कोळी, विलास पाटील (जळगाव) यांचा समावेश होता.



