old man’s neck : वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा भामटा अटकेत

0
18

जळगाव एलसीबीची कामगिरी, चोरट्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील एमआयडीसी परिसरातील एका लॉन्सवर गेल्या ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका लग्न समारंभात ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम सोन्याची चैन चोरट्याने गोड बोलून लांबविली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मेहरूण येथील एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही चोरी अनिल विजय हरताडे (वय ३०, रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल, जळगाव) याने केली असल्याची माहिती एलसीबीला तपासातून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर चैन त्यानेच चोरल्याची कबुली देऊन गुन्हाही कबूल केला आहे. त्यामुळे संशयित आरोपी अनिल हरताडे याला अटक केली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, बाबासाहेब पाटील, अक्रम शेख यांनी केली. तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here