पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नशिराबाद येथील माहेर असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेला मुंबई येथे सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक वादातून शिवीगाळ, मारहाण आणि शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्या त्रासाला कंटाळून याप्रकरणी विवाहितेने नशिराबाद पोलीस ठाण्यात ९ मे रोजी पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.
नशिराबाद येथील माहेर असलेल्या प्रियंका शिवा खरात (वय २०) हिचे जानेवारी २०२४ मध्ये मुंबई येथील शिवा दिनकर खरात यांच्याशी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला होता. तक्रारीनुसार, लग्नाच्या केवळ तीन महिन्यांतच प्रियंकाला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्या त्रासाला कंटाळून प्रियंका अखेर आपल्या माहेरी, नशिराबाद येथे परत आली आणि तिने ९ मे रोजी वाजता पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरुन गुन्हा दाखल
प्रियंकाच्या तक्रारीनुसार, तिचे पती शिवा दिनकर खरात, सासरे दिनकर मारुती खरात, सासू अनिता दिनकर खरात, चुलत जेठ रमेश खरात, मोठी सासू कलाबाई खरात, नणंद जयाबाई जाधव, लक्ष्मी देविदास अंभोरे आणि ज्योती विनोद वाघमारे (सर्व राहणार मुंबई) अशा आठ जणांविरुध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत.