Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Increased activity in Delhi : दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाई दल, नौदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा
    Uncategorized

    Increased activity in Delhi : दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाई दल, नौदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाई दल, नौदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा

    नवी दिल्ली (न्युज नेटवर्क) –

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे उलटले असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असं विधान केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. एकीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी सज्जता वाढवली जात असताना दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दल प्रमुख व नौदल प्रमुखांशी सज्जतेसंदर्भात चर्चा केली.

    आधी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. अरबी समुद्रातील नौदलाच्या तैनातीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. नौदलाच्या पश्चिमेकडच्या आघाडीवरील युद्धनौका सध्या अरबी समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल अरबी समुद्रात सामग्रीसह सज्ज असून केंद्र सरकारचे आदेश आल्यास कारवाईसाठी तयार असल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली आहे.

    नौदल प्रमुखांची भेट झाल्यानंतर काही तासांत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आणीबाणीच्या प्रसंगी कारवाईसाठी हवाई दलाची काय तयारी आहे? यासंदर्भात पंतप्रधानांशी त्यांची चर्चा झाली. या दोन उच्चस्तरीय बैठकांमुळे वातावरण बदलू लागलं आहे.

    या बैठकांबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. मात्र, एकीकडे या बैठकांमध्ये लष्कराच्या तयारीची माहिती घेण्यात आलेली असताना दुसरीकडे संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.