Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Girish Mahajan : अजित पवार गटात गेलेले आधी भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते ; मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
    जळगाव

    Girish Mahajan : अजित पवार गटात गेलेले आधी भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते ; मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

    Vikas PatilBy Vikas PatilMay 4, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अजित पवार गटात गेलेले आधी भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते ; मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

    जळगाव (प्रतिनिधी)-

    जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार व काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. हे सर्वजण आधी आमच्या संपर्कात होते. भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांना प्रवेश दिल्याने आम्हालाही मार्ग मोकळा झाला, असा टोला त्यांनी अजित पवार यांना हाणला आहे.
    जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एमआरआय यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील ,मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी मंत्री महाजन यांनी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशाविषयी भूमिका स्पष्ट केली.

    विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात लढणाऱ्यांना महायुतीत घेऊ नये. घेतलेच तर तपासून घ्यावे, असे ठरले होते. त्यानंतरही अजित पवार गटात शरद पवार गटाच्या माजी मंत्र्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यातील काहीजण आधीच भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते. परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना घेऊ नका म्हणून सांगितले होते. मंत्री पाटील यांच्या विरोधामागे तथ्य असेल. अजितदादा अर्थमंत्री आहेत. त्यांनी ठरविले तर ते कोणाला काहीपण देऊ शकतात. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना त्यांच्याकडून आगामी काळात मोठा निधी मिळू शकतो. परंतु, जिल्हा नियोजनचा निधी पालकमंत्रीच वितरीत करतात, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही दोन माजी मंत्र्यांसह तीन माजी आमदारांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. आमची इच्छा नसतानाही अजितदादा त्यांना सर्वांना पक्षात घेत आहेत. त्यांना पुढे पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यांचा रोख पूर्णतः त्यांचे जळगाव ग्रामीणमधील कट्टर विरोधक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Jalgaon : महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिकेची धडक कारवाई; जैन मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.