Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»missing file : एकनाथ शिंदेंच्या दप्तरी बेपत्ता नोंद झालेले पाकिस्तानी नागरिक फडणवीसांना सापडले!
    क्राईम

    missing file : एकनाथ शिंदेंच्या दप्तरी बेपत्ता नोंद झालेले पाकिस्तानी नागरिक फडणवीसांना सापडले!

    Vikas PatilBy Vikas PatilApril 27, 2025Updated:April 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एकनाथ शिंदेंच्या दप्तरी बेपत्ता नोंद झालेले
    पाकिस्तानी नागरिक फडणवीसांना सापडले!

    मुबई (प्रतिनिधी )-

    पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीच्या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सर्व पाकिस्तानी उद्या सकाळपर्यंत राज्य सोडून निघन जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

    एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी हा देश सोडून निघून जावं. हे प्रत्येक भारतीयांच्या मनातलं फर्मान आहे. महाराष्ट्रातही काही पाकिस्तानी नागरिक होते. त्यापैकी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून चालते व्हा. अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. कारण लोकांच्या मनात चीड आणणारी घटना घडली आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला आहे. फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, “१०७ नागरिक हरवल्याचं बोललं जात आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही.”

    मुख्यमंत्री म्हणाले, जेवढे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आले होते ते सगळे सापडले आहेत सगळे आता देशाबाहेर चालले आहेत. या सर्वांची स्वगृही परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. माझा अंदाज आहे की उद्या सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर एकही पाकिस्तानी राज्यात दिसणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.