सौ. संध्या भोळे यांना विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार 

0
20
साईमत भुसावळ प्रतिनिधी
 येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तु. स. झोपे गुरूजी प्राथमिक विद्या मंदिरातील उपशिक्षिका सौ. संध्या ललितकुमार भोळे यांना शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्काराने नुकतेच पुणे येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले.
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वबंधुता साहित्य संमेलन शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी एस.एम. जोशी सभागृह नवी पेठ, गांजवे चौक पुणे येथे पार पडले. संमेलनाध्यक्ष प्रा. सुभाष वारे, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, उपाध्यक्ष डॉ. अरूण आंधळे, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. संध्या भोळे यांना साहित्यिक योगदानाबद्दल विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप संविधान पुस्तिका व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे, सेक्रेटरी पी. व्ही. पाटील, तु.स झोपे गुरूजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे व सर्व शिक्षक वृ़ंदांनी अभिनंदन केले. अतिशय सन्मानाचा विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here