Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»घाटाच्या कठड्याला पिकअप धडकली; ३ ठार, ५ जण जखमी
    क्राईम

    घाटाच्या कठड्याला पिकअप धडकली; ३ ठार, ५ जण जखमी

    Vikas PatilBy Vikas PatilApril 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घाटाच्या कठड्याला पिकअप धडकली; ३ ठार, ५ जण जखमी

    चाळीसगाव (प्रतिनिधी)

    श्रीरामपूरहून नवस फेडून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे परत येताना २० प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्याला धडकली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले ५ जण गंभीर जखमी झाले हा अपघात बुधवारी रात्री घडला. चाळीसगाव ग्रामीणचे पो नि राहुल पवार यांनी अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    पातोंडा येथील अतुल माळी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी एमएच१९/बीएम ३९४७ या वाहनाने माळी कुटूंबातील २० जण श्रीरामपूर येथे गेले होते. नवस फेडल्यानंतर सर्वजण पुन्हा याच वाहनातून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते.

    या अपघातात सारजाबाई माळी (६५, पातोंडा), नाना माळी (पातोंडा), राहुल महाजन (गुढे, ता. भडगाव) हे तिघे जागीच ठार झाले. राजेंद्र माळी (४२), अनिकेत माळी (१७), गौरव माळी (१७), भिमराव माळी (३८), नाना माळी (३२), सुनीता माळी (३८, सर्व पातोंडा), संदीप माळी, हरचंद पवार, निंबा महाजन (६०, सर्व पोहरे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.

    कन्नड घाटाच्या पायथ्याशी चालकाने वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वळणाचा अंदाज चुकला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन संरक्षण कठड्याला धडकले. २० जण या बसमधून प्रवास करत होते. ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026

    Jalgaon:राजमालती नगर रस्ता बंद होण्यापूर्वी पर्यायी मार्गाची मागणी

    February 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.