मध्यरात्री मशिदीत जिलेटीनचा स्फोट, दोघे ताब्यात
बीड (प्रतिनिधी )-
बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. आता गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात दोन युवकांनी मशिदीत स्फोट घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे.
अर्धमसला गावात मध्यरात्री मशिदीत स्फोट घडवण्यात आला. या स्फोटासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात आला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार गावातील वादातून घडल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमागे मोठे षडयंत्र आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक स्वतः पहाटेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली. याबाबत कोणतीही अफवा पसरू नये, पोलिसांनी जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.