Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
    क्राईम

    अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

    जळगाव ( प्रतिनिधी )

    खेडी फाट्याजवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वराला अज्ञात ट्रकने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

    महेंद्र बोंडे आई-वडीलांच्यासह भुसावळ शहरातील गणेश कॉलनीत वास्तव्याला होता. तो जळगाव येथील एमआयडीसीतील गणेश अल्युमिनियम कंपनीमध्ये कामाला होता. दररोज भुसावळ ते जळगाव दुचाकीने जाणेयेणे करत होता. नेहमीप्रमाणे २९ मार्चरोजी सकाळी महेंद्र दुचाकीने भुसावळकडून जळगावला येण्यासाठी निघाला. खेडीफाट्याजवळ अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यामुळे तो रोडवर पडला आणि त्याला ट्रकने चिरडले. त्यात महेंद्र बोंडे हे जागीच ठार झाले.

    अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.