Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»अर्थ»इलेक्ट्रिक वाहने आता करमुक्त
    अर्थ

    इलेक्ट्रिक वाहने आता करमुक्त

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इलेक्ट्रिक वाहने आता करमुक्त

    मुंबई ( प्रतिनिधी )-

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील कर पूर्ण रद्द करण्याची घोषणा केली. सध्या 30 लाखांपर्यंतच्या ईव्ही वाहनांवर कोणताही कर लावला जात नाही, 30 लाखांवरील लक्झरी सेगमेंटसाठी 6 टक्के कर आकारला जात होता. मात्र, आता हा कर पूर्ण रद्द करण्यात आला आहे. अधिकृत घोषणा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत, “पूर्वी मुख्यमंत्री स्वतः रस्ते धुवायला जायचे, आत्ताचे मुख्यमंत्री जाणार का?” असा खोचक सवाल केला. यावर फडणवीस हसत म्हणाले, “परब यांनी मला रस्त्यावर आणण्याचाच निश्चय केला आहे!” त्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला.

    फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात ईव्ही वाहनांसाठी व्यापक इकोसिस्टीम तयार करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या चर्चेनुसार, 30 लाखांवरील लक्झरी सेगमेंटसाठी 6 टक्के कर लावला जात होता. मात्र, प्रत्यक्षात या सेगमेंटमध्ये सध्या कोणतीही गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने हा कर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    इंधनाचे वाढते दर व पर्यावरणीय हानी लक्षात घेता, सरकार ईव्ही वाहनांना प्राधान्य देत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शक्य त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जातील. आमदारांना दिले जाणारे वाहन कर्ज केवळ ईव्ही गाड्यांसाठीच मर्यादित राहील. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो व बससेवा बळकट केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 2500 ईव्ही बस घेण्याचा विचार सरकार करत आहे. राज्यात ई-चार्जिंगचे जाळे उभारले जात आहे. पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे ईव्ही प्रकल्प सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.