Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»“आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; आरोपी पंटरांना वाल्मिक कराडचा निरोप
    क्राईम

    “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; आरोपी पंटरांना वाल्मिक कराडचा निरोप

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; आरोपी पंटरांना वाल्मिक कराडचा निरोप

    बीड ( प्रतिनिधी )-

    संतोष देशमुख हत्याकांडात ७ डिसेंबर, २०२४ रोजी रात्री आठ वाजता वाल्मीक कराडला सुदर्शन घुलेने फोन केला. फोनवर घडलेली हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असा निरोप वाल्मिक कराडने दिल्याची कबुली घुलेने दिली आहे. (त्याचे पुरावे सादर केले आहेत); हा महत्वाचा मुद्दा आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याच्या पहिल्याच सुनावणीत न्यायालयात मांडला.

    संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासारखा हायप्रोफाईल वकील हा खटला लढवत असल्याने सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले होते. ते न्यायालयात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना होती. उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ल उज्जवल निकम यांनी युक्तिवादात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची कुंडली मांडली.

    आजच्या सुनावणीला वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे आणि वकिलांची टीम उपस्थित होती. वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींची ओळख परेड झाली. उज्ज्वल निकम यांनी केस ओपन करण्याची मागणी केली. त्यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सीडीआर कोर्टासमोर सादर केला. वाल्मिक कराडच्या वकिलांनी हे पुरावे आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी केली.

    आवादा ही ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मस्साजोग गावातील शिवारात ३२ एकर जमिनीवर गोडाऊन केले. त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. ८ ऑक्टोबरपासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली.

    उज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे सर्व पुरावे, कागदपत्रे मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. त्याशिवाय चार्जफ्रेम करता येणार नाही.

    यावर न्यायाधीशांनी कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश दिले. यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो, केस पुढे घेऊन जाऊ शकतो, असे म्हणणे मांडले. यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही, असा मुद्दा मांडला.

    यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. एक तासात संपूर्ण मागणी केलेली कागदपत्रे दिले जातील, असे उज्वल निकम यांनी सांगितले. यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी वाल्मिक कराडच्या केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख १० एप्रिल दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.