Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»निखीलभाऊंची स्वप्नपूर्ती हिच त्यांना खरी श्रध्दांजली – अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर
    मुक्ताईनगर

    निखीलभाऊंची स्वप्नपूर्ती हिच त्यांना खरी श्रध्दांजली – अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर

    saimat teamBy saimat teamJanuary 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
    स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस स्व.निखील खडसे स्मृतीस्थळ, आदिशक्ती मुक्ताईसह सुतगिरणी मुक्ताईनगर येथे अभिवादन करण्यात आले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याहस्ते स्व.निखीलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
    यावेळी स्व.निखील खडसे यांच्या स्मृतीला उजाळा देत रोहिणी खडसे म्हणाल्या, स्व.निखील दादा यांनी त्यांच्या जि.प. सदस्य काळात भरपूर विकास कामे केली. त्याचबरोबर युवकांचे संघटन उभारले. आज राज्यात कुठेही गेलो तरी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटतात व स्व.निखील भाऊ यांची आठवण काढतात.
    एकनाथराव खडसे यांनी स्थापन केलेल्या मुक्ताई सूतगिरणीचे काम पूर्णत्वास जाऊन सूतगिरणी सुरू व्हावी व स्थानिक युवकांना महिलांना रोजगार मिळावा हे निखील भाऊंचे स्वप्न होते. त्यासाठी ते सूतगिरणीचे चेअरमन झाल्यावर त्यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. परंतु काळाने निखीलदादाला आपल्यातून हिरावून नेले. त्यानंतर निखील दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले. आज सूतगिरणी सुरू असून सुमारे २५० युवक, महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लवकरच सूतगिरणीच्या चात्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यातून आणखी लोकांना रोजगार उपलब्ध होईल, ही निखील भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल. भविष्यात जिनिंग, धागा निर्मिती ते कापड निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
    यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प. सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, ईश्वर रहाणे, प्रा.सुनिल नेवे, राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील, दशरथ कांडेलकर, सूतगिरणी उपाध्यक्ष संजय चौधरी, अतुल झांबरे, सुधाकर जावळे, यु.डी.पाटील, शाहिद खान, योगेश कोलते, अतुल पाटील, कल्याण पाटील, पं.स.सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, प्रदिप साळुंखे, विनोद सोनवणे, नगरसेवक पियुष महाजन, निलेश शिरसाट, ललित महाजन, बापू ससाणे, आसिफ बागवान, प्रविण पाटील, मनोज तळेले, दिनेश नेमाडे, पंकज सरोदे, सुनिल काटे, देवराम सुपे, रणजित गोयनका, सुशिल भुते, मयूर साठे, राजेश ढोले, मुन्ना बोंडे, प्रविण दामोधरे, सुमित बर्‍हाटे, पृथ्वीराज पाटील, प्रदीप बडगुजर, आनंद माळी, शिवराज पाटील, विकी मराठे, शुभम मुर्‍हेकर, शुभम चौधरी, कैलास कोळी, राजेंद्र पाटील, शिवा पाटील, संजय तितुर, डी.एम.जगताप, पुरुषोत्तम बढे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने हाहाकार

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.