पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांकडे तक्रार
पाचोरा (प्रतिनिधी)-
अनेक वर्षांपासून पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची होत असलेली दुरावस्था बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष दिपक भोई यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी यासंदर्भात ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. ना. हसन मुश्रीफ यांनी या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासित केले आहे.
पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाची वाट पकडावी लागत आहे. दुरुस्ती होऊन सुविधा उपलब्ध होणे गरजेचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष दिपक भोई, अमरावती शहर कार्याध्यक्ष मथुरा सुरजुसे, चोपडा तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्यासमवेत भेट घेतली