Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली मालगाडी रवाना
    जळगाव

    महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली मालगाडी रवाना

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली मालगाडी रवाना

    भुसावळ रेल्वे विभागात जागतिक महिला दिवस उत्साहात

    भुसावळ (प्रतिनिधी) –

    भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रम घेण्यात आले, महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

    भुसावळ रेल्वे स्थानकावरून खंडवा दिशेने मालगाडी पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली रवाना करण्यात आली. या ट्रेनचे नेतृत्व महिला लोको पायलट ज्योती सिंग, सहायक लोको पायलट शिवानी आणि गुड्स ट्रेन मॅनेजर भाग्यश्री पिंपळे यांनी केले. या गाडीला मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

    मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी भुसावळ स्टेशनवरील टीटीई लॉबीमध्ये महिला टिकट तपासणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला अहमदाबाद ते बरोनी एक्सप्रेस गाडीत भुसावळ ते इटारसी दरम्यान टिकट तपासणी कार्य महिला टीमने पार पाडले. भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रांगोळी, नृत्य, गीतगायन, समूह नृत्य आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचा समावेश होता.

    वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ. विनीला यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि कार्यक्षेत्रातील योगदान याविषयी माहिती मिळाली. भुसावळ नियंत्रक कार्यालयातील ‘पिंक रेल मदद कक्ष’ येथे मंडळ रेल्वे प्रबंधक यांनी महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधला

    यावेळी अपर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, सर्व शाखाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.