जय शिवराय, जय भारत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन

0
7
Version 1.0.0

जय शिवराय, जय भारत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी) –

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती१९ फेब्रुवारीरोजी साजरी करण्यात येत आहे. जळगाव शहरात जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या वतीने देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जय शिवराय, जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ही पदयात्रा सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होईल. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल -कोर्ट चौक – पंडित जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक – टॉवर चौक – चित्रा टॉकिज – शिवतीर्थ असा राहणार आहे. सर्वांनी जय शिवराय, जय भारत पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे रविंद्र नाईक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here