सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या
एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण
जळगाव ( प्रतिनिधी) –
सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील , प्रा. डी. डी. बच्छाव,किरण बच्छाव, विनोद तराळ, छबीराज राणे, दिनेश सोनवणे, राजेश जगताप (एरिया सेल्स मॅनेजर) यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले.
महिंद्रा कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक एसयुव्ही कारने बाजारात दिमाखात प्रवेश केला. या दोन खास कार जळगावच्या बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. 500 पेक्षा जास्त किलोमीटर रेंज, ॲडास लेवल टू प्लस -प्लस, 19 ईंची टायर, 150 लिटर फ्रंक, Be -6 या मॅाडेलमधे 400 प्लस लिटरपेक्षा जास्त बुट स्पेस, XEV-9e या मॅाडेलमधे 670 प्लस लिटरपेक्षा जास्त बुट स्पेस, रियर व्हिल ड्राईव्ह, 21 प्लस बॅटरी टेस्ट झालीय, फ्लश-टाइप डोअर हँडल्स, LED टेल लाइट्स, वायरलेस फोन चार्जर्स, ऑगमेंटेड रियालिटी-आधारित हेड्स-अप डिस्प्ले, ईंग्लो प्लॅटफॉर्म व ६ कलरमधे उपलब्ध आहे
बीइ६ इ या मॅाडेलची शोरूम किंमत १८.९० लाख व एक्सइव्ही९इ या मॅाडेलची शोरूम किंमत २१.९० लाख आहे. या कारचे बुकिंग १४ फेब्रुवारीपासून सुरू आहे. अधिक माहिती सातपुडा ऑटोमोबाईल नशिराबाद रोड येथे संपर्क करावा. असे संचालक किरण बच्छाव यांनी सांगितले.