कुसुंबा शिवारातून घोडा चोरणारे कोंबडी बाजार , शिवाजीनगरातील चोर अटकेत
जळगाव (प्रतिनिधी ) –
कुसुंबा शिवारात मोकळ्या जागेत बांधलेला घोडा चोरणाऱ्या ३ आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत शोधून गजाआड केले . त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला घोडा पोलिसांनी मालकाच्या हवाली केला आहे
फिर्यादी नामे कृष्णा जोशी ( वय २७, रा सिंधी कॉलनी, गणेश नगर) यांचा घोडाबग्गीचा व्यवसाय आहे. त्यांचा १ लाख रुपये किंमतीचा सिंधी जातीचा घोडा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला होता ९ फेब्रुवारीरोजी दुपारी अज्ञात चोरांनी हा घोडा चोरुन नेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसीचे पो नि संदीप पाटील यांनी पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके , सपोउनि दत्तात्रय बडगुजर, पो ना किशोर पाटील, पो कॉ नितीन ठाकुर, राहुल घेटे, सिध्देश्वर डापकर, छगन तायडे यांना कळविले होते. या पथकाने परीसरातील ३५ सिसिटीव्ही तपासले सिसिटीव्ही चित्रणात तिन मुलं घोडा घेवुन जातांना दिसले. ती मुले शिवाजीनगर व कोंबडी बाजार परीसरातली असल्याची माहीती प्राप्त झाली.
या मुलांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेला घोडा ताब्यात घेण्यात आलेला आहे. हा गुन्हा २४ तासात उघडकीस आणुन मालक कृष्णा जोशी यांचे ताब्यात दिल्याने त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत. पुढील तपास स.पो.उ.नि. दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.