जळगाव विमानतळ धावपट्टीचा विस्तार वेगाने होणार

0
19

चिंचोली – नशिराबाद – उमाळा रस्ता व
पुलाच्या कामासाठी 6 कोटी 60 लाख मंजूर

जळगाव (प्रतिनिधी )

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे रस्ता बंद करून पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चे साखळी क्रमांक 13 / 00 ते 18 / 00 कि. मी. दरम्यान रुंदीकरण , चिंचोली ते नशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वहिवाट रस्ता देणे व या रस्त्यावर नाल्यावर पूल बांधकामासाठी 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांच्या निधीस सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 5 जुलै 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार 10 कोटीची मागणी करण्यात आली होती. शक्तीप्रदत्त समितीने 14 जानेवारीरोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने निधी मंजूर केला आहे.
धावपट्टी विस्तारामुळे जिल्ह्यातील विमानसेवा सक्षम होणार असून, औद्योगिक विकास आणि शेतकऱ्यांसाठी संधी ठरणार आहे. काही महिन्यांत या कामांची गती वाढवली जाणार आहे.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा फळा

सध्या जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. विस्तारीकरणामुळे विमानसेवा सक्षम होऊन शेतीमालाच्या कार्गो वाहतुकीस गती मिळणार आहे. नशिराबाद व चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ विमानतळाच्या विस्तारासाठी नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयींसाठीही महत्त्वाचा ठरणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here