प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप प्रकरण; ग्रामस्थांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी

0
1

साईमत सोयगाव प्रतिनिधी :

तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंगळवारी रात्री कुलूप बंद प्रकरणी गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांनी व उपसरपंच संजय पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील, अमृत राठोड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली, दरम्यान २५ सी सी टी व्ही कॅमेरे असतांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप कोणी ठोकले याबाबत शोध घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ चावडा यांनी सांगितले.

दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा डुकरे यांच्यासह आरोग्य सेविका संगीता वानखेडे, अश्या चौघांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा बजावल्या आहे व तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली दखल
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले आहे असे देखील त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here