संविधान स्पर्धेत मयुरी कोळी, गिरीश पाटील प्रथम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शासनाच्या भारतीय संविधान अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत कै. सुनिता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘घर घर संविधान’ कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. त्यानिमित्त शाळेत संविधान उद्देशिकेचे पठण, वर्गावर्गात वाचन, संविधान उद्देशिकेची सामूहिक शपथ, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधानाची निर्मिती व संविधानातील विविध मूल्यांची माहिती देणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यात शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. उपक्रमशील शिक्षक आर.डी. कोळी उपक्रमाचे प्रमुख आयोजक होते.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण अशोक पारधे व वैशाली बाविस्कर यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, ज्येष्ठ कलाशिक्षक एस.डी. भिरुड, प्रमुख आयोजक आर.डी. कोळी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संजय बाविस्कर, संगीता पाटील, तनुजा चौधरी, भारत गोरे यांनी परिश्रम घेतले.
असे आहेत बक्षीसपात्र विद्यार्थी
संविधान पठण आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांमध्ये गटात (आठवी ते दहावी ): प्रथम – मयुरी कोळी, द्वितीय-जान्हवी सोनवणे, तृतीय -चांदणी सूर्यवंशी, उत्तेजनार्थ -जान्हवी कुलकर्णी तर लहान गटात (पाचवी ते सातवी) : प्रथम-गिरीश पाटील, द्वितीय-महिमा पाटील, तृतीय – चंचल बारी, उत्तेजनार्थ-गौरी सोनार यांचा समावेश आहे.