चाळीसगावात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा

0
3

महाविद्यालयाचे मैदान ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांची काढली रॅली

साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ अंधशाळा, प्रियदर्शनी वनश्री दादासाहेब डी.डी.चव्हाण बहुविकास कृषी संस्था संचलित डी.डी.चव्हाण मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा हिरापूर रोडवरील नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे मैदान ते श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.लुईस ब्रेल, डॉ.हेलन केलर व सरस्वती माता यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून दीपप्रज्वलन समाज कल्याण अधिकारी, विजय रायसिंग वैसाका जिल्हा परिषद जळगाव, माधुरी भागवत, मिनाक्षी निकम अध्यक्ष स्वयं दीप फाउंडेशन चाळीसगाव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनायकराव चव्हाण, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब काका पाटील, सोनूसिंग राजपूत, धनंजय चव्हाण, ॲड.साहेबराव पाटील, महेश चव्हाण, हरीश महाले, गणेशकर, साईभक्त सदाशिव वैद्य, सुनील देशमुख, प्रियदर्शनी वनश्री, डी.डी.चव्हाण, बहुविकास व कृषी संस्थांचे अध्यक्ष प्रभाकर पवार, सचिव पुष्पांजली पवार, उज्वला पाटील, दीपक पाटील, रमेश चव्हाण, मानसी वाजट संमिश्र केंद्र जळगाव, डॉ.मंदार करंबळेकर, वैद्यही कळंबळेकर, अरुण पाटील, साहेबराव पवार आदी मान्यवरांनी केले.
समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, स्वयमदीप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा िमनाक्षीताई निकम, आ.मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश चव्हाण, ‌राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धांना प्रारंभ झाला. दिव्यांगांची विविध प्रवर्गानुसार खेळ प्रकार वयोगटानुसार घेण्यात आले. दिव्यांगांच्या जिल्ह्यातील १८ दिव्यांग शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग
नोंदवला.

विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन केला गौरव

स्पर्धेचा समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती चाळीसगावचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांच्याहस्ते नैपुण्य यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ॲड.साहेबराव पाटील यांनी सर्वात जास्त बक्षिसे मिळवलेल्या संघाला अकराशे रुपये बक्षीस दिले. आलेल्या सर्व पाहुण्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल, असे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here