भडगावात सकल हिंदू समाजाचे काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन

0
4

तहसिलदारांसह पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

साईमत/भडगाव/प्रतिनिधी

बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी हिंदू आणि गैर-मुस्लिमांवर कहर सुरू केला आहे. जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत.गेल्या २ महिन्यांपासून हिंदू मंदिरे आणि वस्त्या जळून खाक झाल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारले जात आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात १० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. भडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भडगाव तहसिल कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलन करुन दुपारी तहसीलदार शीतल सोलाट व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले.

समस्त हिंदू समाजातर्फे आंदोलनात अधिक लोक सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष, महिलांचा सहभाग दिसून आला. ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्ण दास प्रभूच्या सुटकेची मागणी हिंदूंनी लावून धरली आहे. हिंदूंवर होत असलेल्या अपराधांचा आणि क्रौर्याचा निषेध केला.

बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांचे सरकार गैर-मुस्लिम, विशेषत हिंदूंना संरक्षण देत नाही. त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवला आहे. आमची मंदिरे जाळली जात आहेत. आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जात आहेत. हिंदूंना वेठीस धरले जात आहे, महिलांची इज्जत लुटली जात आहे, हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीने घेतले जात आहेत. भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांनाही हुसकावून लावावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. युनूस सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिवस असल्याने याबाबत आंदोलकांनी खंत व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती

यावेळी डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, सोमनाथ पाटिल, शिवदास आप्पा महाजन, सचिन चोरडिया, डॉ.निलेश महाजन, रवींद्र पाटील, भिकन महाजन, शाम मुसंडे, नाना हडपे, ॲड.प्रकाश तिवारी, ॲड. निलेश तिवारी, अँड. विनोद महाजन, ॲड. विजय महाजन, ॲड. प्रकाश सोनवणे, ॲड. भय्यासाहेब अहिरे, ॲड.के.टी. पाटील, ॲड बी.आर.पाटील, प्रा. देवेंद्र मस्की, प्रा.सुरेश कोळी, नरेंद्र पाटील, नितीन महाजन, सतीश वाजपेयी, सागर महाजन, मुन्ना परदेशी, अजय चौधरी, विशाल चौधरी, डॉ. स्वप्निल पाटील, सुरेश पवार, सचिन जयस्वाल, दादा भोई, सूर्यभान वाघ, विकास महाजन, भूषण पवार, दीपक महाजन, शुभम सुराणा, सिद्धार्थ सुराणा आदींसह सकल हिंदू बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here