अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक गंभीर

0
5

टाकळी फाट्याजवळील घटना

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी

शिक्षक दुचाकीने शाळेतून घरी जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी झाले. ही घटना टाकळी फाट्याजवळील मोताळा येथे घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

सविस्तर असे की, मोहन त्र्यंबक सालवे हे शाळेतून दुचाकीने (क्र.एम.एच.२८ बी.झेड.५२४६) घरी जात असताना समोरून येणारी अज्ञात वाहनाच्या (क्र.एम.एच.१२ जी.एफ.४४३९) चालकाने जोरदार धडक दिल्याची घटना गेल्या २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टाकळी फाटा, मोताळा येथे घडली होती. अपघातात शिक्षकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागेवरच जखमी अवस्थेत पडून होते. त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

जखमीचे भाऊ दिलीप सालवे यांनी ९ डिसेंबर रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सारंग नवलकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here