महिलेच्या पर्समधून अडीच लाख लंपास ; दोन संशयितांना घेतले ताब्यात

0
8

चाळीसगाव पोलिसात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी

येथील महिला धुळे येथून मुंबई येथे रेल्वेमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समधून चोरट्यांनी अडीच लाख लंपास केल्याची घटना घडली. याबाबत चाळीसगाव पोलिसात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव येथील रहिवासी शितल कैलास पाखले ह्या धुळे येथून मुंबईला जात होते. रेल्वेत चढत असताना गर्दीचा फायदा घेत पर्समधील अडीच लाख रुपये लंपास केले. यात महिलेचे व महिलेच्या पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोटारसायकलची चाबी सुध्दा चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत चाळीसगाव पोलीस नोंद केली आहे. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, मनमाड लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर, प्रभारी अधिकारी सुरेश भाले, रेल्वे सुरक्षा बल चित्रेश जोशी, राजेशकुमार केसरी, निरीक्षक अतुल टोके यांच्या मार्गदर्शनाखाली फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलिस ठाणे चाळीसगाव पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते, श्रेणी पीएसआय अनंत रेणुके, पो.ना. पंकज पाटील, मोहसिन अली सय्यद,फरीद तडवी यांनी रेल्वे सुरक्षा बल चाळीसगाव येथील उपनिरीक्षक पी.डी.पाटील, किशोर चौधरी, आरक्षक रेहान अहमद, गोविंद राठोड यांच्या मदतीने संशयित आरोपी अर्जुन उर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (वय २५, रा. मारोती मंदिराजवळ, धारणगाव ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (वय २३, रा.मारोती मंदिराजवळ धारणगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), आकाश परवेश पगारे (वय ११, रा.वॉर्ड नं २ अहिल्यादेवी नगर, धनगर चौक, श्रीरामपूर, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख १९ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here