साईमत।यावल।प्रतिनिधी
गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची ८ डिसेंबर १९४६ स्थापना केली होती. त्यानिमित्त जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार यावल पथकातील तालुका समादेशक अधिकारी विजय रामा जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड पथकाने शहरातील मुख्य रस्त्यावर एस.एस. खान चौक, महाजन गल्ली, म्हसोबा चौक, मेनरोड, पोलीस कवायत मैदान परेड पथ संचलन तसेच पोलीस कार्यालय मैदान तसेच पोलीस स्टेशन याठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
यशस्वीतेसाठी तालुका समदक्षिक अधिकारी विजय जावरे, वरिष्ठ पलटण नायक पंकज फिरके, कंपनी सर्जन मेजर ज्योती बारी, भगवान पाटील, संतोष बारी, टेकचंद फेगडे, अर्चना कोळी, संगीता पाटील, निशा कदम, सोनल कोळी, प्रवीण तेली, रउफ खान यांच्यासह पुरुष व महिला होमगार्ड कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.