मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
सामाजिक न्याय आणि अधिकारीता, मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग भारत सरकार अंगीकृत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जामनेरातील विश्व शांती दिव्यांग बहुउद्देेशीयचे संस्थाध्यक्ष पवन विश्वनाथ माळी यांना सन्मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी रेडक्राॅस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी घनश्याम महाजन, चेअरमन विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, जि. प.चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांंच्या हस्ते पवन माळी यांना सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, पुष्पा भंडारी, नोडल अधिकारी जी. टी. महाजन, दिव्यांग विभागाच्या माधुरी भागवत, स्वयंदीप प्रकल्पाच्या संचालिका मिनाक्षी निकम, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, युथ फॉर जॉबचे महेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध सामाजिक दिव्यांग संस्था, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस. पी. गणेशकर, सुवर्णा चव्हाण, रेडक्रॉसचे लक्ष्मण तिवारी, उज्ज्वला वर्मा, मनोज वाणी, योगेश सपकाळे, समाधान वाघ, सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.