मंगरूळला तरुणाचा खून झाल्याचा संशय

0
6

एमआयडीसी परिसरात आढळला मृतदेह

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी 

तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरूणाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुषार चिंधू चौधरी (रा.मारवड, ता.अमळनेर, ह.मु. प्रताप मील, अमळनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

सविस्तर असे की, अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चौधरी हा तरूण वास्तव्याला होता. गुरूवारी, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा बाहेर गेलेला होता. त्यानुसार तो घरी परतला नाही. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला.

मृतदेहाजवळच दारूच्या बाटल्या आढळल्या

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोउनि बागुल, पोहेकॉ कैलास शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा आढळून आल्याने त्यांचा खून केला असावा,असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या मृतदेहाजवळच दारूच्या बाटल्या पडलेल्या मिळून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here