विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून महामानवांचे विचार अंगीकारावे

0
7

भगीरथ शाळेत आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सुदाम निकम यांचे प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तके वाचून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारावे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुदाम निकम यांनी केले. जळगाव शहरातील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. त्यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर. डी. कोळी यांनी ‘उपकार ‘कविता सादर केली. आर. डी.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका आर. जी.सपकाळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. शाळेची माजी विद्यार्थिनी संजना मोरे हिने सुमधुर आवाजात बाबासाहेबांचे गीत सादर केले. कु. लावण्या तायडे हिने गीत सादर केले. तसेच मयुरी कोळी, चांदणी सूर्यवंशी, सम्राट धुरंदर, पियुष मगरे, ओजस्वी बुंदले, खुशी निकम, अनिकेत जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक आयोजन प्रमुख अशोक पारधे यांनी करून डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर ‘बाबासाहेब गेले तेव्हा’ ही कविता ही सादर केली. सूत्रसंचालन सुनील तायडे तर आभार रुपाली कोठावदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here