यावल शहरासह रावेर मतदारसंघात महायुतीचा जल्लोष

0
6

भाजपाला मुख्यमंत्री पद मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा

साईमत/यावल/प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी घेतली. याबद्दल यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला.

यावेळी यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बाळू उर्फ हेमराज हेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे, पुंडलिक बारी, अरुण पाटील, बबलू घारू, पी.एस.सोनवणे, सागर चौधरी, श्री.पाचपांडे, उमेश पाटील, मुकेश कोळी, वेंकटेश बारी, किशोर कुलकर्णी, विशाल शिर्के, युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज बारी, तेजस पाटील, दीपक चौधरी, पराग सराफ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here