अध्यक्षपदी बबलू चव्हाण तर उपाध्यक्षपदी जगदीश पाटील यांचा समावेश
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
येथील पोलीस ग्राउंडवर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी बबलू अंबरसिंग चव्हाण तर उपाध्यक्षपदी जगदीश वसंत पाटील यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी उमेश चिंधा ठाकरे, कोषाध्यक्ष विनोद प्रभाकर घुमरे, सचिव अरुण पंडित गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख पुष्कर राजेंद्र कुमावत, सल्लागार सुनिल दिनकर पाटील, संघटक अनिल बंकट राठोड, सहसंघटक तुषार भिकन तांबे, सहसचिव सतीश कैलास पाटील, सदस्यपदी भाऊसाहेब पिलोरे, सुपडू गोकुळ, गोरख राठोड, रविंद्र मोरे, राहुल चौधरी, रमेश आव्हाड, सुनिल कापसे, विष्णू राठोड, मुश्ताक शेख, विलास पाटील, गणेश गोयर, विजय पाटील, दीपक अहिरे, दिनकर कदम, ममराज चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणींना उपस्थित सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्याध्यक्ष उमेश ठाकरे यांनी चाळीसगाव नगरीचे आ. मंगेश चव्हाण चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यास संघटनेचे अध्यक्ष बबलू चव्हाण यांनी अनुमोदन दिले.