जरंडीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा स्तुत्य उपक्रम
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील जरंडी येथील अपघातात ठार झालेल्या दोन्ही मयतांच्या वारसांना गुरुवारी जरंडी येथील ग्रामीण बँकेच्यावतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेच्या मंजूर रक्कमेचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. येथील गणेश पवार व राहुल राठोड या दोन तरुणांचा सुपा येथे अपघातात मृत्यू झाला होता.
दोघांना जरंडी येथील ग्रामीण बँकेने जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ देऊन वैशाली गणेश पवार व देवकाबाई लिंबाजी राठोड या वारसदार यांना बँकेचे व्यवस्थापक अक्षय भुतेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी डॉ.गोपाल पवार, व्यवस्थापक अक्षय भुतेकर, सह व्यवस्थापक हेमंत पाटील, राजू तडवी, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.