समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे वाहिली शहिदांना आदरांजली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील काव्यरत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी संविधानाची सामूहिक शपथ घेतली. तसेच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्याच्या घटनेवर ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता कोळी यांनी ‘शहीद वीर’ कविता सादर केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर होते. त्यांनी ‘संविधानाची निर्मिती व बाबासाहेबांचे योगदान’ विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, किशोर पाटील, संतोष साळवे, संजय बाविस्कर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी अशोक पारधे तर समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी आभार मानले.