‘बाप्पा’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
‘भोंगा’, ‘धग’, ‘हलाल’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक तथा बेस्ट डायरेक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिवाजीराव लोटन पाटील यांच्याकडून ‘बाप्पा’ चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी चाळीसगाव येथील बालकलाकार मनस्वी सचिन सोनवणे हिची आणि देवम पाटील (सातारा) यांची निवड झाल्याबद्दल ‘बाप्पा’ टिमने अभिनंदन करून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ नुकताच झाला. अनेक पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत काम करण्याचा योग व अनुभव मनस्वीला येत असल्याचे तिने सांगितले.
चाळीसगावच्या चिमुरडीच्या ‘बाप्पा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मनस्वी ही लहान बंधू तथा चाळीसगाव येथील अंधशाळेचे प्राचार्य सचिन यशवंतराव सोनवणे आणि कळमडू येथील कन्या शाळेतील शिक्षिका गजश्री सचिन सोनवणे यांची लहान कन्या असल्याचे डाॅ.प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.