भडगावला समस्त माळी समाजातर्फे तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन
साईमत/भडगाव/प्रतिनिधी
माजी आ. सतिष भास्कर पाटील आणि नवाज सैय्यद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याबाबत तसेच माळी समाजाबद्दल नको ते अश्लील पोस्ट टाकल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे निवेदन समस्त माळी समाजातर्फे तहसीलदार शितल सोलाट, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना देण्यात आले. दोघांच्या विरोधात कायदेशीर तक्रार असून या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी एकनाथ महाजन, शिवदास महाजन, साहेबराव महाजन, विजय महाजन, मुकुंदा महाजन, भिकन महाजन, विष्णू महाजन, विनोद महाजन, गणेश महाजन, सखाराम महाजन, लक्ष्मण महाजन, अनिल महाजन, गौरव माळी, मनोज महाजन, प्रदीप महाजन, सुरेश महाजन, सागर महाजन, विकास महाजन, नितीन महाजन, सागर महाजन, संतोष महाजन, देवराम महाजन, विजय माळी, ललित महाजन, जीवन महाजन, दयाराम वाघ, रमेश महाजन, शुभम महाजन, दिनेश माळी, भीमराव महाजन, मधुकर महाजन, दीपक माळी, दत्तात्रेय महाजन, मनोज महाजन, अवधूत महाजन, सोपान महाजन यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते.