विद्यार्थ्यांनी नेहरुविषयी व्यक्त केली मनोगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे विद्यार्थी छायेंद्र पाटील, रुद्र शिंपी होते. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. यावेळी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी छायेंद्र पाटील याने नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच त्यांच्या राजकीय जीवनाविषयी आपले मत व्यक्त केले. रुद्र शिंपी याने नेहरूजींची मुलांविषयी असलेली भूमिका, त्यांना लहान मुले व फुले आवडत होती. म्हणून त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगितले. सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ प्रमुख संतोष कचरे तर आभार आठवीची विद्यार्थिनी नूतन वाणी हिने मानले.