वादविवाद निर्माण होणाऱ्या पोस्ट, चित्रफित व्हायरल केल्यास गुन्हा दाखल होणार

0
18

सावदाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची माहिती

साईमत/सावदा,ता.रावेर/प्रतिनिधी

विविध कारणावरून सध्याच्या काळात दोन समाज, दोन धर्म, दोन जात, तसेच जातीय, धार्मिक, राजकीय, भावनिक तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर काही व्हीडीओ, मजकुर असे प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या समाजमाध्यमावर कुठल्याही जातीचा, धर्माचा पंथाचा अवमान होणार नाही अथवा राजकीय भेद निर्माण होवून आपापसात वाद होणार निर्माण होणार नाही. त्याची खबरदारी घेऊन कुणीही समाज माध्यमांवर व्हिडीओ, मजकुर प्रसारित करु नये शांतता राखावी, असे सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले.

आपल्याला आलेले व्हिडीओ किंवा मॅसेज खात्री केल्याशिवाय प्रसारित, फॉरवर्ड करु नये. सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टमुळे किंवा व्हिडीओद्वारे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन व संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा सर्व चुकीच्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जनहितार्थ केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here