मलकापुरला नूतन विद्यालयातील मानवी साखळीने वेधले लक्ष
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
येथील निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या आदेशान्वये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे, मुकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरीता स्विपअंतर्गत विविध कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अशातच मलकापुरातील नूतन विद्यालयात मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मानवी साखळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी नोडल अधिकारी एन.जे.फाळके, सहाय्यक नोडल अधिकारी एन.बी.शिंदे, आर.एम.वाघमारे, नूतन विद्यालयाचे प्राचार्य अविनाश बोरले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.