मुक्ताईनगर विधानसभा संघात गृह मतदान प्रक्रिया

0
12

गृह मतदानासाठी पात्र उमेदवारांची संख्या १७८ राहणार

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

शहरातील मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी गृह मतदान प्रक्रिया ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत ८५ वर्ष वयापेक्षा जास्त, दिव्यांग मतदार, दीर्घ आजाराने खाटेवर पडून असलेल्या गृह मतदानासाठी पात्र उमेदवारांची संख्या १७८ आहे. त्यापैकी ८५ वरील वयोवृद्ध मतदार १५२ तर दिव्यांग मतदार २६ असे आहेत. गेल्या दोन दिवसात गृह मतदानाद्वारे मतदारांनी आपल्या मताधिकाराचा हक्क बजाविला आहे. या प्रक्रियेत टपाली मतपत्रिकेवर मत नोंदविले जाते.

८ नोव्हेंबरला ९७+१६ =११३, ९ नोव्हेंबरला ४७+०९ =५६. उर्वरित नऊ मतदारांपैकी चार मयत आहेत तर उर्वरित पाच मतदार यांना पुनश्च १५ नोव्हेंबर रोजी होम वोटिंगचा लाभ घेता येईल. या प्रक्रियेसाठी ११ पथकांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पथकांसोबत सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑबजर्व्हर), व्हिडीओग्राफर, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. गृहमतदानाच्या वेळापत्रकाबाबत उमेदवारांना लेखी सूचनेद्वारे कळविण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here