Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»रामराज्य सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद : महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज
    फैजपूर

    रामराज्य सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद : महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 30, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गणेश, दुर्गा पुरस्कार सोहळ्याची ‘गो’ पूजनाने सुरुवात

    साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

    हिंदूंनी विशेषतः तरुणांनी गणेश, दुर्गोत्सव तसेच अन्य सण साजरे करतांना त्यास सनातन सकल हिंदू समरसता व धार्मिक परंपरेने साजरे करावेत. हिंदू संस्कृतीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्यात परिवर्तन होणे काळाची खरी गरज आहे. हा गरजेचा शुभारंभ रामराज्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि फैजपूर शहरातून होत आहे, त्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केले. शहरातील रामराज्य सेवाभावी संस्थेतर्फे गणेशोत्सवातील ‘एक दुर्वा समर्पणाची’ आणि दुर्गोत्सवातील ‘एक जागरण अंबा मातेचे’ अशा स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात संत महंत यांच्या हस्ते ‘गो’ पूजनाने करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. तदनंतर गणेश मूर्ती, श्रीराम भारतमाता तैलचित्राचे विधीवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी योगेश पाटे, पप्पू चौधरी, सूरज गाजरे, मंडळाचे पदाधिकारी व दाते नरेंद्र नारखेडे यांनी सत्कारार्थी मनोगत व्यक्त केले तर पवनदासजी महाराज यांनी मार्गदर्शनपर आशीर्वाचन केले.

    ‘एक दुर्वा समर्पणाची’ अंतर्गत राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रथम पुरस्कार- सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळ किरंगे वाडा, विश्वगुरू स्वामी विवेकानंद द्वितीय पुरस्कार – आराधना गणेश मित्र मंडळ सराफ गल्ली, सरदार वल्लभभाई पटेल तृतीय पुरस्कार-हिंदूराजे गणेश मित्र मंडळ, बोरोले वाडा, विशेष उत्तेजनार्थ बाळ गंगाधर टिळक पुरस्कार – राजबाग बाल गणेश मित्र मंडळ साने गुरुजी नगर तर उत्तेजनार्थ पुरस्कार नूतन गणेश मित्र मंडळ होले वाडा, त्रिवेणी गणेश मित्र मंडळ त्रिवेणी वाडा यांचा समावेश आहे.

    ‘एक जागरण अंबा माते’ अंतर्गत राजमाता जिजाऊ प्रथम पुरस्कार – शिवाजी दुर्गोत्सव मित्र मंडळ-शिवाजीनगर, पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर द्वितीय पुरस्कार-जय संतोषी माता दुर्गोत्सव मित्र मंडळ हनुमान नगर, शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई तृतीय पुरस्कार-संभाजीराजे दुर्गोत्सव मित्र मंडळ देवीवाडा, उत्तेजनार्थ पुरस्कार- रामदेव बाबा दुर्गोत्सव मित्र मंडळ रामदेवबाबा नगर व जय आंबिका दुर्गोत्सव मित्र मंडळ, श्रीराम पेठ यांना ह्या पुरस्कारांचे दाते सतपंथ मंदिर गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खंडोबा मंदिर उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, गणपती वाडी मंदिर विश्वस्त उमेश गुजराथी, डॉ.भरत महाजन, शिवानी ब्युटीक, रामराज्य संस्था, तुळजाभवानी मंदिराचे अध्यक्ष किरण (तुकाराम) बोरोले, सिद्धेश्वर वाघुळदे, श्रीराम मंदिर विश्वस्त नरेंद्र नारखेडे, डॉ.भरत महाजन, चंद्रशेखर चौधरी तसेच शास्त्री स्वयंमप्रकाश दासजी महाराज, शास्त्री अनंतप्रकाश दासजी महाराज, प्रभू कन्हैय्यादास महाराज यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, अथर्वशिष्य, दुर्गा सप्तशदी पाठ पुस्तके देवून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात विजेत्यांना, सर्व मंडळाध्यक्षांना तसेच गो सेवा पालन करणारे शेतकरी कृणाल कोल्हे,स्थानिक मूर्ती बाल कलाकार योगेश भारंबे, वैद्यकीय क्षेत्रातून एमपीएससी वैद्यकीय अधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम येणारी डॉ.दीपल पाटील यांना भगवत गीता पुस्तक देत मानाचा फेटा परिधान करून सन्मानित करण्यात आले.

    यांची लाभली उपस्थिती

    सुरुवातीला आराधना गणेश मंडळ सराफ गल्लीतील नम्रता सराफ ह्या तरुणीने स्थानिक कलाकार सोबत स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अत्याचार, प्रेम विवाह फसवणूक आदीविषयी जनजागृतीपर सुंदर नाटिका तसेच शुभम चौधरी प्रा.उत्पल चौधरी यांच्या स्वागत गीत सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, पवनदासजी महाराज, शास्त्री अनंत प्रकाशदासजी, कोठारी शास्त्री स्वयंम प्रकाशदासजी, ह.भ.प. प्रवीणदास महाराज, माजी नगरध्यक्ष बी.के.चौधरी, डॉ. जागृती फेगडे, आ.प्रतिनिधी धनंजय चौधरी, नरेंद्र नारखेडे, चंद्रशेखर चौधरी आदी उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    याप्रसंगी डॉ.भरत महाजन, किरण बोरोले, डॉ.प्रशांत पाटील, प्रजापिता ब्रम्ह विद्यालयाचे शकुंतला दीदी, मीरा दीदी, तनुजा सराफ, प्रतीक होले, बंडू सोनवणे, उल्हास वाघुळदे, साजन चौधरी, राहुल साळी यांच्यासह गणेश दुर्गा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, नागरिक, महिला उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अतुल महाजन, निलेश चौधरी, राजाभाऊ चौधरी, निलेश कोल्हे,भारती पाटील, अनुराधा परदेशी, उत्सव समितीचे कृणाल कोल्हे, वसंत परदेशी, कांतीलाल चौधरी, नाना वैद्य, बाळा पाटील, भूषण नारखेडे, तेजपाल चौधरी, मनोज होले, करण परदेशी, प्रकाश ठोंबरे, प्रशांत इंगळे, राजू सनसे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रामराज्यचे संस्थाध्यक्ष संजय सराफ तर आभार मृणालिनी राणे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Yaval : ८ वर्षीय ओमने पार केले अडीच तासांत १७ किमी सागरी अंतर

    January 12, 2026

    Yaval:यावल तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि बेसुमार वृक्षतोड, नागरिक नाराज

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.