निर्मल हॉटेलजवळ घडला अपघात : वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी
वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निर्मल हॉटेल समोरील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काहुरखेडा येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, अज्ञात वाहनावरील चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मयत विशाल सुरेश पाटील (वय २७, रा.काहुरखेडा) यास जोरात ठोस मारुन त्याच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत करुन त्याच्या मरणाला कारणीभूत होवून अज्ञात वाहन न थांबता पळुन गेला आहे.
म्हणून चंद्रकांत शांताराम पाटील (वय ३५, पोलीस पाटील, काहुरखेडा, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.