अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

0
22

विक्रेत्यांकडून समाजातील लोकांची माफी मागून सर्वांचे झाले समाधान

साईमत/बोदवड/प्रतिनिधी

तालुक्यातील जामठी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशा आशयची मागणी ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे केली होती. दोन दिवस बोदवड पोलीस स्टेशनकडून अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी तात्पुरती दारू विकायचे बंद केले. दारूमुळे गावातील १५ ते २५ वयोगटातील मुले व्यसनाधीन झाल्यामुळे काहींचे संसार उद्‍ध्वस्त झाले. हा रोष अनेक महिलांच्या मनामध्ये असून मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून दारूबंदीचे घोषणा दिल्या. पोलिसांची गाडी गावात येताच सर्व दारू विक्रेत्यांनी दारूचे खोके लंपास केले.

जामठी येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आढळून आले की, अवैध दारू विक्रेते दारू विकत आहे, अशी माहिती मिळताच गावातील २०० महिला व शंभर पुरुष एक सोबत ग्रामपंचायतच्या आवारात आली . सरपंच व पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन लावून पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. एपीआय सुजित पाटील व त्यांची टीम पोहोचताच त्यांना घटनेची माहिती दिली. एपीआय सुजित पाटील यांनी सर्व दारू विक्रेत्या स्थळावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. परंतु कुणाच्याही अड्ड्यावर एकही दारूची बाटली मिळाली नाही.

गावातील एका नागरिकाने दारू विक्रेत्याला दारू बंद करण्याबद्दल सांगायला गेल्यावर त्या विक्रेत्याकडून नागरिकाला जातीवाचक शब्द बोलून त्याचा अवमान करण्यात आला. त्यामुळे समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. परंतु उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी मध्यस्थी करून विक्रेत्यांकडून समाजातील लोकांची माफी मागायला लावून सर्वांचे समाधान केले. सर्व अवैध दारू विक्रेत्यांना पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी पोलीस स्टेशनला बोलावून नोटिसा बजावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here