पिकअप वाहन, डंपरच्या धडकेत चालक ठार, दोन जखमी

0
16

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी

तालुक्यातील कुऱ्हा ते मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन आणि डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. भावसिंग रामदास पवार (रा. धानोरी, ता. बोदवड) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा ते मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ पिकअप वाहन (क्र.एमएच १९ सीवाय८०४९) आणि डंपर (एमएच१९ झेड ३९४३) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात पिकअप वाहनातील चालक भावसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले प्रवीण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले होते. याप्रकरणी ईश्वर संजु जाधव(वय २५, रा. धानोरी, ता.बोदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here