जळगावातील कलावंत गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल महोत्सवात

0
9

सत्य परिस्थितीशी झुंज देणारा “ढुण्या” लघुचित्रपटाची स्क्रिनिंगसाठी निवड

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

आदिवासी समाजातील रहिवाशी असणाऱ्या सत्य परिस्थितीशी झुंज देणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा जीवन संघर्षमय दाखविल्याने “ढुण्या” लघुपटाची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयमध्ये स्क्रिनिंगसाठी दखल घेतल्याने निवड झाली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयमध्ये निवड होऊन “ढुण्या” चित्रपटाची स्क्रिनिंग होणार आहे. त्यासाठी जळगावचे कलावंत प्रकाश गजाकुश कुटुंबीय गोव्यातील फिल्म फेस्टिव्हल महोत्सवात सहभागी होणार आहे. अनेक गोष्टी तडजोड होत असल्याने एक नवीन काहीतरी उपक्रम करायचा म्हणून जळगाव शहरातील काही तरुण पिढीने कलात्मक गोष्टी करून लघुपट बनवायचे ठरविल्याने जळगावचा डंका फिल्मी दुनियेत वाजु लागला आहे. जळगाव शहरातील युवा अभिनेता, दिग्दर्शक प्रेम बडगुजर “ढुण्या” मराठी लघुपटाचे उदाहरण आहे. सत्य परिस्थितीशी निगडित भाष्य करणारा लघुपट अनेक मान्यवरांनी वाखाणला आहे. जळगाव जिल्ह्यामधील एका ग्रामीण भागातली ही कथा असून प्रेक्षकांना रडवून सोडत आहे.

कथेचा विषय असा

आदिवासी बालकाचा शिक्षकासाठी जीवनमय संघर्ष आदिवासी समाजातील एका लहान मुलाचे स्वप्न असते की, शिक्षण घेऊन ‘सर’ व्हावे, पण आई नसल्याने त्याची थोरली बहीण त्याचा सांभाळ करते. बाप पूर्ण नशेच्या आहारी गेलेला असल्याने बापाला त्याचे काहीच सोयरसूतक नसते. स्वतःचे पोट भरण्यासाठी मातीची चूल विकली जाते. परंतु सर्वांकडे गॅस असल्याने कोणीच चूल विकत घेत नाही. एकाच भाकरीच पीठ असून कोणाकोणाला पुरणार. चार दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे काहीच सुचत नाही. ढुण्याल्या हे सगळ कळत असूनही काय करावं कळत नाही. अशातच बहीणीला कुठलाच पर्याय दिसत नसून तिला नाइलाजने ती ढुण्यासाठी भाकर चोरून घेऊन येते. अशा विविध तऱ्हेने ढुण्याचा संघर्ष, बहिणीची भाकरीसाठीची वणवण, बापाला दारूचे व्यसन आणि काम न करून शिक्षणाचा विरोध अशा रंगांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रेम बडगुजर यांनी उत्तम कलात्मक पद्धतीने आणि सर्वांकडून अचूक काम करून “ढुण्या” लघुपटाची उत्तम व चोख कामगिरी बजावली आहे. अनेक एकांकिका, नाटक, मराठी अल्बमस गाणी असे अनेक कलात्मक अभिनय, दिग्दर्शन केले आहे.

लघुचित्रपटाला यांनी बजावली उत्तम कामगिरी

लघुपटाचे चित्रीकरण रीतिक महाले, आर्ट दिग्दर्शन लोकेश भांडारकर, संगीत अनिल धुमाळ साऊंड, डिजाइन एपोस्ट्रोफ स्टुडिओ, प्रोडक्शन हेड नाटक कंपनी, प्रसिद्धी प्रमुख विनायक लोखरे, मेकअप पूजा निकम, मॅनेजमेंट सलील तडवी, निखिल कोष्टी, गजाकुश ग्रुप अशा अनेक कलावंतानी लघुचित्रपटासाठी उत्तम कामगिरी बजावली आहे.

लघुचित्रपटामुळे समाजाला मिळणार प्रबोधन

लघुचित्रपटामुळे समाजाला प्रबोधन मिळणार आहे. अर्धवट स्वप्न असलेली मुले-मुली यांनी काय करावे असा संदेश “ढुण्या” लघुचित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. हीच प्रेरणा निर्माण करणारा “ढुण्या” लघु चित्रपट यशस्वी ठरत असल्याचे प्रेम बडगुजर याने सांगितले.

दिग्दर्शक प्रेम बडगुजर विविध फेस्टीव्हलमध्ये सहभागी

“ढुण्या” लघुचित्रपटाची गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंगसाठी निवड व्हिडिओमेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये चार हजारमधून निवड केली आहे. शॉर्टफेस्ट फिल्म फेस्टिव्हल गुजरात स्क्रिनिंगसाठी सहभाग तसेच मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभाग नोंदविला आहे.

लघुचित्रपटातील मुख्य बालकलाकार असे

“ढुण्या” लघुचित्रपटात समर्थ गजाकुश – ढुण्या, राजश्री गजाकुश-संगीता तसेच सहकलाकार प्रकाश गजाकुश, दीपक गजाकुश, अथर्व पाटील, गोविंद बारेला आदी कलावंतांनी लघुचित्रपटात भूमिका निभावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here