तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातील मुलींनी रांगोळी काढून रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली

0
20

तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातील मुलींनी रांगोळी काढून रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली

साईमत/यावल/प्रतिनिधी

येथील लहान मारोती देशमुखवाडा जवळील तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातर्फे विजयादशमीच्या दिवशी मुलींनी उत्कृष्ट आकर्षक रांगोळी काढून उद्योगपती स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ही रांगोळी वैष्णवी भोसले, अश्विनी ढाके, तेजस्विनी सोनार, मोहिनी भोसले, दिव्या भोसले, भाग्यश्री सोनार, लावण्या भोसले, नेहा भोसले यांनी साकारली. रांगोळीची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष किशोर माळी यांनी मांडली.

कार्यक्रमास किशोर माळी, दत्तू पाटील, घनश्याम पाटील, दिनेश माळी, प्रकाश भोसले, यशवंत भोईटे, पंकज माळी, स्नेहल फिरके, बाळू सोनार, नितीन माळी, गुड्डू माळी, वैभव माळी, निलेश माळी, वाल्मीक भोसले, संजय फिरके यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. देशमुख वाडा, बोरावलगेट परिसरासह संपूर्ण यावल शहरातून श्रद्धांजलीयुक्त उत्कृष्ट रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी उपस्थिती देऊन रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here