विकास कामांना पोहोचविण्याच्या ध्येयाला ‘महायुती’ सरकारची साथ

0
28

उर्वरित इतर तांडे वस्तींनाही निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : आ.मंगेश चव्हाण

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहोचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आ.मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या संकल्पाला यश मिळाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चा कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आ.मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी, यासाठी महायुतीचे सरकार तात्काळ निर्णय घेत आहेत. ९ ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेंतंर्गत चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चार कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे आता तांडे गाठत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा लवकरच पोहचणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले तालुक्यातील ३२ तांडे विकासाच्या प्रवाहात येणार आहे.आ.चव्हाण यांनी तालुक्याचा विकास या दिशेने सुरू केला आहे की, आमदार चव्हाण यांनी केलेल्या विकास कार्याची बेरीज जोडल्याशिवाय तालुक्याचे सर्व गणित अपूर्ण राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here