उपक्रमाचे कौतुक करुन ग्रामस्थांनी मानले आभार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एल.एच.व्ही.श्रीमती जयश्री वसंत कुलकर्णी यांच्यावतीने चिंचखेडा बु.येथील ४८ गरजू मुलांना विजयादशमीनिमित्त शनिवारी कपडे वाटपासह मिठाईचे वाटप करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानण्यात आले.
यांची हाेती उपस्थिती
याप्रसंगी श्याम कुलकर्णी, लमेश कुलकर्णी, रवींद्र सूर्यवंशी, वैशाली पाटील, दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.