जामनेरच्या विकासाचे खरे ‘शिल्पकार’ गिरीष महाजन

0
14

जामनेरातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

गेल्या ३० वर्षात जामनेर तालुक्याचे खरे ‘शिल्पकार’ ना. गिरीष महाजन यांनी शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्त बसत नाहीत. त्यासाठी वाट्टेल ते परिश्रम घेण्याची आणि कामास तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे जामनेर तालुक्याचा सर्वांगिण विकास होतांना दृष्टीक्षेपास पडत असल्याचे गौरवोद्गगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीचे आणि भुसावळ चौकात घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भीमसृष्टीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, खा.उदयनराजे भोसले, आ.छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

गिरीषभाऊ महाजन हे फक्त उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असणार आहे. त्यांना कोणीही येथे पराजित करू शकत नाही. त्यांची कामे करण्याची हातोटी असल्याने ना.महाजन यांना ‘संकटमोचक’ म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यांची लाभली उपस्थिती

लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय मंत्री खा. रक्षाताई खडसे, मंत्री ना.गिरीष महाजन, खा.स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा सौ.साधना महाजन, आ.संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, रवींद्र झाल्टे, महेंद्र बाविस्कर, तुकाराम निकम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here