Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरला अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे उजळले ‘भाग्य’ : मंत्री अनिल पाटील
    अमळनेर

    अमळनेरला अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे उजळले ‘भाग्य’ : मंत्री अनिल पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुमारे ४५ कोटी निधीतून रस्त्यांची होणार दर्जोन्नती

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. सुमारे ४५ कोटी निधीतून रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाच्यावतीने प्रशासकीय मान्यतेचे आदेश ८ ऑक्टोबर रोजी निघाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

    मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर मतदारसंघांत नवीन रस्त्यांची मालिकाच अवतरली आहे. शहर व ग्रामीण भागात दळणवळणास वेग आला आहे. मारवड ते बोहरा, मारवड ते शहापूर, कळमसरे ते शहापूर, खेडी खवशी रस्ता आणि पळासदडे ते रामेश्वर जुनोने रस्ता अशा रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अशा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मिळविल्याने ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

    या रस्त्यांना मिळाली मंजुरी

    मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये प्रजिमा-४९ (मारवड) ते बोहरा रस्ता, एकूण लांबी ५.४००(कि.मी.) अंदाजित किमंत ४००.५७ (रु.लाख), मारवड खेडी वासरे ते शहापूर रस्ता एकूण लांबी १०.४०० (कि.मी.) अंदाजित किंमत १०३६.६८ (रु.लाख) ७०.५३ (रु.लाख), कळमसरे शहापूर ते इजिमा-७७ रस्ता (एक तास) एकूण लांबी ७.१०० (कि.मी.), अंदाजित किमंत ७४५.४१ (रु.लाख), रामा-३९ ते खेडी ढोक रस्ता, एकूण लांबी ३.००० (कि.मी.), अंदाजित किंमत २८४.०९ (रु.लाख), निंभोरा अमळगाव-खेडी-खवशी ते नांद्री रस्ता एकूण लांबी ११.३०० (कि.मी.) अंदाजित किंमत ११११.०७ (रु.लाख), पळासदळे-रामेश्वर ते जुनोने रस्ता एकूण लांबी १३.२५० (कि.मी.), अंदाजित किंमत ९०९.३८ (रु.लाख) असे एकूण ५०.४५० (कि.मी.) लांबीचे रस्ते ४४८७.२० (रु.लाख), निधीतून होणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसह हे रस्ते मंजूर झाले असल्याने यासाठी २९६.०७ रु.लाख रकमेस मंजुरी देण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे मानले आभार

    रस्त्यांना मंजूरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.