दोन एकर जागेत व्हॉलीबॉल, हँडबॉल खेळांच्या क्रीडा साहित्यासह फलकाचे अनावरण

0
16

दोन एकर जागेत व्हॉलीबॉल, हँडबॉल खेळांच्या क्रीडा साहित्यासह फलकाचे अनावरण

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सांघिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तारुण्यातच नोकरी मिळावी, मोबाईलपासून युवा पिढी लांब रहावी, यासाठी चाळीसगावातील श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगिण विकास मंडळाच्या माध्यमातून मंडळाच्या दोन एकर जागेत व्हॉलीबॉल व हँडबॉल खेळांच्या क्रीडा साहित्यासह फलक अनावरणाचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

चाळीसगाव येथील श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगिण विकास मंडळाच्या माध्यमातून गेली ३५ वर्ष सर्व मित्र एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित असतात. त्याचप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील लोणजे येथे स्व. श्याम अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील होतकरू तरुणांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरुवातीला व्हॉलीबॉलच्या क्रीडांगणावर नारळ वाढवून याच आवारातील मंडळाच्या फलकाचे अनावरण मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा.रमेश आवटे, मुख्याध्यापक बी.बी. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना मैत्री कशी असावी, मित्राचे जीवनातील महत्त्व हे सांगताना तरुणांमध्ये सांघिक खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळातूनच तरुणांना नोकरी प्राप्ती व्हावी, सुदृढ शरीर, निरोगी मन तयार व्हावे, युवक मोबाईल व अन्य वाईट मार्गापासून लांब रहावा, या उद्देशाने मित्र परिवाराच्या आर्थिक सहकार्यातून व्हॉलीबॉल, हँडबॉल अशा खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याचेही विचार मान्यवरांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

वेळी मंडळाचे सचिव रमेश जानराव, जयंत साळी, प्रा. रमेश आवटे, ॲड.प्रदीप अहिरराव, मिलिंद देशमुख, उमेश मराठे, रमेश रोकडे, हेमंत साळी, बी. बी. सोनवणे, अक्षय अग्रवाल, सूर्यकांत वाणी, संतोष शर्मा, दत्ता थोरात, एस. आर. देशमुख, सुनील भावसार, अरुण वाणी, जितेंद्र वाणी, दिलीप चित्ते, विशाल कांबळे, निलेश मेहता, जे. पी. वाघ, प्रशांत पाटील, डॉ. गोरख राठोड, ॲड. संजय चव्हाण, रंगराव राठोड, राजेंद्र जाधव (पोलीस), रामेश्वर राठोड, कांतीलाल राठोड, अशोक पाटील, ममराज राठोड, योगेश राठोड, रामेश्वर राठोड यांच्यासह गावातील नागरिक, लहान खेळाडू, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here